मोदींमुळे पीएम केअरला दिले अडीच लाख; पण आईचा बेडअभावी मृत्यू
देश बातमी

मोदींमुळे पीएम केअरला दिले अडीच लाख; पण आईचा बेडअभावी मृत्यू

नवी दिल्ली : कोरोनामुळे देशातील आरोग्य व्यवस्था कोलमडली असून कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारच्या उपाययोजणा कमी पडत असल्याचे दिसत आहे. देशाला संकटातून बाहेर काढण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात पीएम केअर फंडामध्ये देणगी दिली. मात्र तरी देखील देशाची परिस्थिती खराब आहे. गुजरातमध्ये विजय पारिख यांच्या आईला कोरोना झाल्यानंतर बेड न मिळाल्याने त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांनी पीएम केअर फंडासाठी २ लाख ५१ हजार रुपयांची देणगी दिली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, त्यांनी रोष व्यक्त करत ट्वीट करून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न केला आहे. पुढच्यावेळी किती दान द्यावे लागेल की, अशी परिस्थिती येणार नाही, असे त्यांनी ट्विट केले आहे. पीएम केअर फंडामध्ये दिलेल्या देणगीचा स्क्रीनशॉट शेअर करत पारीख यांनी हे ट्विट केले आहे. २ लाख ५१ हजार रुपयांची देणगी दिल्यानंतरही मला माझ्या आईला रुग्णालयात बेड मिळू शकला नाही. कृपया मला सांगा की, मला कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत बेड आरक्षित करण्यासाठी आणखी किती दान करावे लागेल. जेणेकरुन मला माझ्या कुटुंबातील एखादा सदस्याला वाचवता येईल. विजय पारीख यांनी ट्विट केल्यानंतर त्यांचे ट्विट सोशल मीडियामध्ये जोरदार व्हायरल होत आहे.

https://twitter.com/VeejayParikh/status/1396834006897815562

विजय पारीख हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थक आहेत आणि त्यांनी त्यांच्या समर्थनार्थ २०१० पासून अनेक ट्विट केले आहेत. ट्विटर वापरकर्त्यांनी त्यांच्या ट्विटचा हवाला देत भारतीय जनता पार्टीवर टीका केली आहे. परीख यांनी ट्विटमध्ये पीएमओ, राजनाथ सिंह, आरएसएस आणि स्मृती इराणी यांना टॅग केले आहे.