कोरोना लढ्यात आरसीबीची उडी; आतापर्यंतची सर्वात मोठी मदत जाहीर
क्रीडा

कोरोना लढ्यात आरसीबीची उडी; आतापर्यंतची सर्वात मोठी मदत जाहीर

बंगळुरु : संपूर्ण देश कोरोनाच्या दुसर्‍या लाटेशी झुंज देत आहे. प्रत्येकजण आपापल्या स्तरावर मदत करत आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्माही मदतीसाठी पुढे आले. या जोडीने कोरोना पीडितांच्या मदतीसाठी ११ कोटी रुपयांचा निधी जमा केला. आता विराट नेतृत्व करत असेलेल्या आयपीएल स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या मालक कंपनीने आतापर्यंतची आयपीएल संघानी केलेल्या मदतीपैकी सर्वात मोठी मदत केली असून तब्बल ४५ कोटी देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. हा निधी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी वापरला जाणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आरसीबीची मालक कंपनी डिएगोने प्रत्येक राज्यातील एका जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्याची पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ४५कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर दीर्घकालीन ऑक्सिजनची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी २१ शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट बसविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

आरसीबीच्या मालकाने आणखी १५ शहरांमध्ये १६ खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद कृपालू म्हणाले, की या संकटादरम्यान कंपनीला देशातील लोकांसमवेत उभे राहायचे आहे. कंपनीचे मुख्य लक्ष्य सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हॉस्पिटलचे बेड आणि ऑक्सिजन केंद्रे प्रदान करणे हे आहे.