वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा खाणीत बुडून मृत्यू
बातमी महाराष्ट्र

वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा खाणीत बुडून मृत्यू

पुणे : वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा खाणीत बुडुन मृत्यू झाल्याची घटना लोणावळ्यात घडली आहे. मागील आठवड्यात वाढदिवस झाल्यानंतर त्यांचं सेलिब्रेशन म्हणून पिंपरी चिंचवडमधील पाच मित्र लोणावळ्याच्या कुसगाव परिसरात फिरण्यासाठी आले होते. तेव्हा, ही दुर्दैवी घटना घडली असून यात खाणीत बुडून वाढदिवस वाढदिवस झालेल्या तरुणासह त्याच्या मित्राचा मृत्यू झाला आहे. आकाश गुरव आणि धिरेंद्र त्रिपाठी अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात राहणाऱ्या आकाश गुरवचा मागील आठवड्यात वाढदिवस झाला होता. त्यांचं सेलिब्रेशन करण्यासाठी आकाश त्याच्या मित्रांसह लोणावळा परिसरात फिरण्यासाठी आला होता. दरम्यान, आकाश आणि धिरेंद्र हे दोघे ही खाणीत पोहण्यासाठी उतरले तेव्हा, त्या दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने पोहत असताना त्यांचा बुडून मृत्यू झाला.

ही घटना गुरुवार रोजी दुपारी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती तातडीने लोणावळा ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. तर, शिवदुर्ग रेस्क्यू पथकाने त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.