पंतप्रधानांसोबत अनेकदा शरीरसंबंध ठेवलेत; ब्रिटीश पंतप्रधानासंदर्भात महिलेचा गौप्यस्फोट
बातमी विदेश

पंतप्रधानांसोबत अनेकदा शरीरसंबंध ठेवलेत; ब्रिटीश पंतप्रधानासंदर्भात महिलेचा गौप्यस्फोट

न्यूयॉर्क : मी पंतप्रधानांसोबत अनेकदा शरीरसंबंध ठेवलेत असा गौप्यस्फोट ब्रिटीश पंतप्रधानासंदर्भात एका अमेरिकन महिलेने केला आहे. महिला उद्योजिका असणाऱ्या जेनिफर अर्करीने ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत आपले शरीरसंबंध होते असे एका मुलाखतीत म्हटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या प्रकरणासंदर्भात बोरिस जॉन्सन यांच्याविरोधात चौकशीही सुरु झाली आहे. जेनिफरने दिलेल्या माहितीनुसार जॉन्सन आणि त्यांचं नात २०१२ ते २०१६ असं चार वर्ष होतं. याच कालावधीमध्ये जॉन्सन हे लंडनचे महापौर होते. त्यांनी आपली आधीची पत्नी मरीना व्हीलर यांच्याशी पुन्हा विवाह केला होता. जेनिफर ही बोरिस यांच्यापेक्षा २१ वर्षांनी लहान असून अनेकदा आम्ही एकाच खोलीत झोपायचो असंही जेनिफरने सांगितलं आहे.

द मिररला दिलेल्या मुलाखतीमध्ये जेनिफरने मी ज्या बोरिस जॉन्सन यांना ओळखते होते त्याचं अस्तित्वच आताच्या पंतप्रधानांमध्ये दिसून येत नाही, असं म्हटलं आहे. २०१९ मध्ये पहिल्यांदा या दोघांमधील नात्यासंदर्भात माहिती समोर आली तेव्हा बोरिस जॉन्सन यांनी मला मदत करण्यास नकार दिल्याचा दावाही जेनिफरने केला आहे. २०११ साली एका कार्यक्रमामध्ये आमची पहिल्यांदा भेट झाली होती. त्यानंतर पुढच्या वर्षी महापौर पदाच्या पोटनिवडणुकींसाठीच्या प्रचारामध्ये मी बोरिस यांच्यासाठी स्वयंसेवक म्हणून काम केलं होतं, असंही जेनिफरने सांगितलं आहे. लंडनमधील जेनिफर यांच्या घरीच पहिल्यांदा दोघांनी शरीरसंबंध ठेवले होते असा दावा जेनिफरने केला आहे.