लहान मुलांच्या लसीबाबत अदर पूनावालांची मोठी घोषणा
देश बातमी

लहान मुलांच्या लसीबाबत अदर पूनावालांची मोठी घोषणा

पुणे : सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. सिरम इन्स्टिट्युटच्या पुण्यातील मांजरीतील प्लांटमध्येच कोविशिल्ड लसींची उत्पादन सुरू आहे. १८पेक्षा वरच्या सर्वांना ही लस दिली जात असून आता १८ वर्षांखालील वयोगटाच्या लोकसंख्येला देखील लस मिळण्याची प्रतीक्षा लागलेली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शुक्रवारी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये अदर पूनावाला यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. लहान मुलांसाठी सिरमच्या कोवावॅक्स लसीच्या चाचण्या अगदी सुरळीतपणे सुरू आहेत. जर सर्व चाचण्या आणि प्रक्रिया व्यवस्थित पार पडली, तर पुढील वर्षाच्या सुरुवातीला अर्थात जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्ये लहान मुलांसाठी लस येईल, असं अदर पूनावाला म्हणाले आहेत. अनेक स्वयंसेवकांना तपासण्यांसाठी लसीचे डोस देण्यात आले आहेत. चाचण्या व्यवस्थित सुरू आहेत. या वर्षाखेरीसपर्यंत या चाचण्यांचा आढावा घेतला जाईल, असं देखील पूनावाला म्हणाले.

दरम्यान, चाचण्यांच्या प्रक्रियेविषयी माहिती देताना अदर पूनावाला म्हणाले, ही लस लहान मुलांसाठी किती सुरक्षित आहे हे तपासण्यासाठी आम्हाला किमान ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागेल. आम्ही टप्प्याटप्प्याने यावर काम करत आहोत. १२ वर्षांच्या खालीव ल मुलांचा देखील चाचण्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. सर्व पालकांना त्यांची मुलं सुरक्षित हवी आहेत. आम्हाला याचा विश्वास वाटतोय की कोवावॅक्सला पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापर्यंत मंजुरी मिळालेली असेल. मात्र, जेव्हा डीसीजीआयला हे करणं योग्य वाटेल, तेव्हाच हे घडू शकेल.