सर्वसामान्यांपेक्षा एड्सग्रस्तांना कोरोनाचा संसर्ग कमी; एम्सचा निष्कर्ष
देश बातमी

सर्वसामान्यांपेक्षा एड्सग्रस्तांना कोरोनाचा संसर्ग कमी; एम्सचा निष्कर्ष

नवी दिल्ली : सर्वसामान्यांच्या तुलनेत एड्सग्रस्तांना कोरोना संसर्ग होण्याचं प्रमाण कमी असल्याचं एका पाहणीतून समोर आलं आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयाने कोरोनाच्या पहिल्या लाटेत ही पाहणी केली होती. १६४ एड्सग्रस्तांमध्ये अँटिबॉडिज १४ टक्के आढूळन आली. या सर्व रुग्णांनी एड्स बाधितांवर केल्या जाणाऱ्या एंटी-रेट्रो व्हायरल उपचारासाठी संपर्क केला होता. MedRxiv या संकेतस्थळावर हा पाहणी अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सप्टेंबर आणि नोव्हेंबर २०२० या दरम्यान एचआयव्ही बाधित रुग्णांचे नमुने गोळा करण्यात आले होते. एम्सने केलेल्या पाहणीनुसार या काळात दिल्लीत करण्यात आलेल्या सिरो सर्वेक्षणाचा पॉझिटिव्हीटी रेट २५.७ टक्के होता. एम्स रुग्णालयाच्या मेडिसिन विभागातील सहाय्यक प्राध्यापक नीरज निश्चल यांनी याविषयी बोलताना सांगितलं की, पहिल्या लाटेनंतर आम्ही माहिती गोळा केली. दुसऱ्या लाटेतील परिस्थितीविषयी आम्हाला माहिती नाही. मात्र, कोरोनाविषयक नियमांचं काटेकोरपणे पालन हे सुद्धा एड्सग्रस्तांनामध्ये कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी असण्याचं कारण असू शकतं, असं त्यांनी सांगितलं.

एचआयव्हीग्रस्त लोकांमध्ये कमी प्रमाणात अँटिबॉडिज आढळून आली. यामागील कारणांवरही डॉ. नीरज निश्चल यांनी बोलताना एड्सग्रस्त असल्याने कोरोना होऊनही त्यांच्यामध्ये अँटिबॉडिज तयार झाली नसावीत किंवा तयार झालीही असतील, मात्र जास्त काळ राहिली नसतील, असंही ते म्हणाले. एम्सने दिल्लीतील शहरी भागातील लोकांचं सिरो सर्वेक्षणही केलं होतं. दिल्लीत एप्रिल आणि मेमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढण्यापूर्वी म्हणजे मार्चमध्ये सिरो सर्वेक्षण करण्यात आलं होतं. ज्यात प्रतिपिंडांचं प्रमाण ७४.७ टक्के आढळून आलं होतं. इतकंच नाही, तर कोविड झालेल्यांपैकी सौम्य लक्षणं आणि लक्षणं नसणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जास्त होतं. दुसऱ्या लाटेनंतर म्हणजे नोव्हेंबरमध्ये दिल्लीत करण्यात आलेल्या सिरो सर्वेक्षणात लोकांमध्ये अॅटिबॉडीज वाढ झाल्याचं दिसून आलं होतं.