राज्यात 5 टप्प्यांत अनलॉक होण्याची शक्यता; पाहा कसे हटणार लॉकडाऊन
बातमी महाराष्ट्र

राज्यात 5 टप्प्यांत अनलॉक होण्याची शक्यता; पाहा कसे हटणार लॉकडाऊन

पुणे : राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत लागू केलेले कठोर निर्बंध आता हटवण्यात येण्याची शक्याता आहे. दर आठवड्याला जिल्ह्यांचा आढावा घेऊन आणि जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट बघून टप्पे बदलण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. अनलॉकचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

किती टप्प्यांचा समावेश..
पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांत अनलॉक करण्यात येणार आहे. सर्व 18 जिल्हे अनलॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला असून दुसर्‍या टप्प्यात 5 जिल्हे अनलॉक करण्यात येतील. तर तिसऱ्या टप्प्यात 10 जिल्हे आणि चौथ्या टप्प्यात 2 जिल्ह्यांचा समावेश आहे.

असे आहेत 5 टप्पे..
पहिला टप्पा- 5 टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि 25 टक्केच्या आत ऑक्सिजन बेड आहे तिथे लॉकडाऊन राहणार नाही. मॉल्स हॉटेल्स दुकाने वेळेचे बंधन नाही.

अनलॉक झालेले राज्यातील 18 जिल्हे
भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यात पूर्णपणे अनलॉक करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात क्रीडांगण, खासगी आणि शासकीय कार्यालय पूर्ण सुरू होतील, चित्रपट गृह सुरू होतील. जिम, सलून सुरू राहणार असून बस 100 टक्के क्षमतेने चालू राहतील. आंतरजिल्हा प्रवास मुभा राहणार आहे. त्याचबरोबर ई-कॉमर्स सेवा सुरू राहणार आहेत. गार्डन, वॉकिंग ट्रॅकला परवानगीबरोबरच थिएटर सुरू होणार आहेत. चित्रपट शूटिंगला परवानगी असून जमावबंदीही या जिल्ह्यात राहणार नाही.

दुसरा टप्पा..
दुसऱ्या टप्प्यात एकूण 5 जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार, अहमदनगर, अमरावती, हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये 50 टक्के हॉटेल सुरू राहतील. मॉल्स, चित्रपटगृह 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. मुंबई लेवल 2 मध्ये असल्याने लोकल बंदच राहणार असून सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम 50 टक्के क्षमतेने घेता येतील, लग्न सोहळा मॅरेज हॉल 50 टक्के आणि जास्तीत 100 लोकांच्या उपस्थितीत चालू ठेवता येईल. अंत्यविधीस सगळे उपस्थितीत राहता येणार आहे. मिटिंग आणि निवडणूक 50 टक्के उपस्थितीत, बांधकाम, कृषी कामे खुली, जीम, सलुन, ब्युटी पार्लर, स्पा 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यात आली आहेत. शासकीय बस 100 टक्के आसन क्षमतेनुसार सुरू राहणार आहेत. जिल्हाबाहेर जाण्यासाठी ई-पासची गरज नसेल, पण जिथ रेड झोन यात जाण्यास किंवा येण्यास ई पास लागेल.

तिसरा टप्पा..
तिसऱ्या टप्प्यात अकोला, बीड, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, गडचिरोली, उस्मानाबाद या 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. या टप्प्यात केवळ अत्याआवश्यक दुकाने सुरू राहणार आहेत. सकाळी 7 ते 2 आणि इतर दुकाने, सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 सर्व खुले राहतील, मॉल्स थिअटर्स सर्व बंद राहतील. सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स 50 टक्के खुले दुपारी 2 पर्यंत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल, शनिवार रविवार पूर्णपणे बंद राहील. त्याचबरोबर, लोकल बंद राहतील, मॉर्निग वॉक, मैदाने, सायकलिंग पाहटे 5 ते सकाळी 9 मुभा असेल. 50 टक्के खासगी आणि शासकीय कार्यालय सुरू राहतील. आऊटडोअर क्रीडा सकाळी 5 ते 9 सुरू सोमवार ते शुक्रवार, स्टुडिओत चित्रीकरण परवानगी असेल. सोमवार ते शनिवार करता येईल. त्याचबरोबर, मनोरंजन कार्यक्रम 50 टक्के क्षमतेने करण्यात येणार असून दुपारी 2 पर्यंत खुले असणार आहेत. सोमवार ते शुक्रवार, लग्नसोहळ्याला 50 टक्के क्षमतेने तर अंत्यविधी 20 लोक मुभा असतील, बांधकाम दुपारी दोन पर्संत मुभा आहे. कृषी सर्व कामे मुभा असून ई कॉमर्स सेवा दुपारी 2 पर्यंत सुरू, जमावबंदी संचारबंदी कायम राहील.

चौथ्या टप्प्यात पुणे, रायगड दोन जिल्ह्यांचा समावेश आहे.

पाचवा टप्पा..
उर्वरित सर्व जिल्ह्यांचा पाचव्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. तेथे निर्बंध कठोर असणार आहेत.