टेक इट EASY

सावधान.. पेटीएमच्या कॅशबॅक ऑफरच्या मेसेजला बळी पडू नका

नवी दिल्ली : ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्म वरून अनेकदा तुम्हाला कॅशबॅकच्या ऑफर दिल्या जातात. त्यामुळे आपण अनेकदा ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्मवरून मिळणाऱ्या या ऑफरला बळी पडतो. मात्र, अनेकदा या ऑफर बनावट आणि फेक असू शकतात या ऑफरला युजर्स बळी पडतात आणि आर्थिक नुकसान होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सध्या पेटीएम या ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्मने देखील युजर्सला सतर्कतेचा इशारा दिला आहे. पेटीएमवरुन एक बनावट, फेक मेसेज व्हायरल होत आहे, ज्यात 2647 रुपयांचा कॅशबॅक ऑफर केला जाण्याचे सांगण्यात येत आहे.

फेक, बनावट वेबसाईटवरुन, फोनवर एक मेसेज पॉपअप होत आहे, ज्यात ‘अभिनंदन, तुम्हाला पेटीएम स्क्रॅचगार्ड मिळाले आहे’ असा मेसेज दिला जात आहे. युजरने यावर क्लिक केल्यानंतर, Paytm-cashoffer.com वर रिडायरेक्ट केले जाते. ही लिंक केवळ स्मार्टफोनवरच काम करते. या फेक साईटचे डिझाईन आणि पॅटर्न पूर्णपणे खऱ्या पेटीएम सारखेच वाटते, त्यामुळे युजरला खरी आणि फेक साईट ओळखणेही कठीण होते. त्यामुळे असा फेक मेसेज आल्यास सावध रहा. तसेच आर्थिक फसवणूकी पासून सावध रहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *