कोव्हॅक्सिन लसीची 18 वर्षाखालील मुलांवर चाचणी सुरु
देश बातमी

कोव्हॅक्सिन लसीची 18 वर्षाखालील मुलांवर चाचणी सुरु

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम सर्वसाधारण वयातील नागरिकांवर मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर तिसरी लाट येणार असल्याचे बोलले जात आहे. तिसऱ्या लाटेचा परिणाम हा मोठ्या प्रमाणात १८ वर्षे वयाखालील मुलांवर होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भविष्यातील धोका ओळखून भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी जूनपासून चाचणी करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार देशातील वेगवेगळ्या केंद्रांवर 2 ते 18 वयोगटातील मुलांवर लस चाचणी सुरु केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशातील एकूण ५२५ मुलांवर चाचणी करण्यात येणार आहे. चाचणीसाठी मुलांचे वय किमान २ वर्षे असायला हवे असे स्पष्ट करण्यात आले आहे. पाटणा एम्समध्ये लहान मुलांवर ट्रायल करण्यास सुरुवात झाली आहे. नुकतेच पाटण्यातील एम्समध्ये तीन मुलांना लसीचा पहिला डोस दिला आहे.

कोरोना लसीचा डोस घेण्यासाठी एकूण १५ मुले आली होती. त्यापैकी ३ मुलांची निवड केली. तत्पूर्वी मुलांची आरटी पीसीआर आणि अँटीबॉडी तपासणी करण्यात आली. दरम्यान ३ मुले चाचणी करण्यासाठी योग्य असल्याने त्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. लस दिल्यानंतर या मुलांना जवळपास दोन तास देखरेखीखाली ठेवण्यात आले, आता या मुलांना लसीचा दुसरा डोस 28 दिवसांनंतर दिला जाणार आहे.