कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात ३ हजार ३२० नवे रुग्ण; तर दिवसभरात ६१ जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात आज दिवसभरात ३ हजार ३२० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर ४ हजार ५० जणांनी दिवसभरात कोरोनावर मात केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आजपर्यंत राज्यात ६३ लाख ५३ हजार ०२९ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२२ टक्के एवढे झाले आहे. तसेच आज राज्यात
सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण ३९ हजार १९१ करोना बाधित रुग्ण आहेत. तर राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५ लाख ३४ हजार ५५७ झाली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात हाहाकार केला. दरम्यान दुसरी लाट ओसरत असली तर राज्यात अद्यापही दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या ही कधी करोनामुक्त झालेल्यांपेक्षा कमी तर कधी जास्त आढळून येत आहे. तर, कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येत मात्र रोज भर पडतच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *