राज्यातील रिकव्हरी रेट ९६.२७ टक्के; नव्या बाधितांपेक्षा बरे होणारे रुग्ण दुप्पट
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील रिकव्हरी रेट ९६.२७ टक्के; नव्या बाधितांपेक्षा बरे होणारे रुग्ण दुप्पट

मुंबई : राज्यातील दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत असला तरी धोका मात्र टळलेला नाही. राज्यात गेल्या २४ तासांमध्ये नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधितांपेक्षा करोनाव मात करून बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा हा जवळपास दुप्पट असल्याचं दिसून आलं आहे. आज दिवसभरात एकूण ७ हजार ७६१ नवे कोरोनाबाधित आढळले असून त्या तुलनेत १३ हजार ४५२ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आज बऱ्या झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीनंतर राज्यात आजपर्यंत कोरोनावर मात केलेल्या एकूण रुग्णांचा आकडा आता ५९ लाख ६५ हजार ६४४ इतका झाला आहे. पण दुसरीकडे राज्यातील नव्या बाधितांची देखील आज भर पडली असून आजपर्यंत राज्यात करोनाची लागण झालेल्या नागरिकांची संख्या ६१ लाख ९७ हजार ०१८ इतकी झाली आहे. त्यापैकी १ लाख १ हजार ३३७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.