धक्कादायक..! युगांडाचा वेटलिफ्टर ज्युलियस सेकितोलेको टोकियोतून गायब
क्रीडा

धक्कादायक..! युगांडाचा वेटलिफ्टर ज्युलियस सेकितोलेको टोकियोतून गायब

टोकियो : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होण्यासाठी आता काही दिवसांचा अवधी उरला असताना जपानमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पश्चिम जपानमध्ये ट्रेनिंग करणारा युगांडाचा वेटलिफ्टर अचानक गायब झाला आहे. या २० वर्षीय वेटलिफ्टरचे नाव ज्युलियस सेकितोलेको असे असून प्रशासन त्याचा शोध घेत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नेहमीची पीसीआर चाचणीचा अहवाल दर्शविण्यातही सेकितोलेको अपयशी ठरला होते. त्यानंतर तो हॉटेलच्या खोलीत सापडला नाही. इझुमिसानो प्रशासनाने सांगितले, युगांडाच्या संघाचा सदस्य अचानक बेपत्ता झाला आहे आणि तो पोहोचला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सुरक्षितपणे आयोजित केली जाईल, अशी ग्वाही जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा यांनी दिली आहे.

जपानमधील करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २३ जुलैपासून रंगणाऱ्या ऑलिम्पिकसाठी प्रेक्षकांना प्रवेश नाकारण्यात येणार आहे. यामुळे आयोजकांवरील कार्याचा भार कमी झाला असून कोरोनाला आळा घातला येईल, असे सुगा यांनी म्हटले आहे. प्रेक्षकांना प्रवेशबंदी नाकारण्याचा आयोजकांचा निर्णय योग्यच आहे. यामुळे स्पर्धेचे आयोजन अगदी सुरळीतपणे करण्याबरोबरच आम्हालाही परदेशातून येणाऱ्या खेळाडूंच्या आरोग्याकडे अधिक बारकाईने लक्ष देणे सोपे होईल, असे सुगा म्हणाले.