अखेर चेंबूर दुर्घटनेचं बचावकार्य संपले; मृत्यूचा आकडा 21वर
बातमी मुंबई

अखेर चेंबूर दुर्घटनेचं बचावकार्य संपले; मृत्यूचा आकडा 21वर

मुंबई : चेंबूर दुर्घटनेचं बचावकार्य अखेर संपले असून आतापर्यंत 21 जणांचे मृतदेह बाहेर काढले आहे. तर 2 जणांवर उपचार सुरू आहे. एनडीआरएफने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभर बचावकार्य सुरू होतं. आता संध्याकाळी ते संपले आहे. आतापर्यंत 21 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्याचबरोबर आता 2 जणांना राजावाडी हॅास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पाऊस सुरू असल्यामुळे मदतकार्य आणि रेस्क्यू ॲापरेशन करण्यास अडथळा येत होता. मात्र अखेर ॲापरेशन आता संपलेल आहे, अशी माहिती आशिष कुमार यांनी दिली. तसंच, घटनास्थळी अजूनही धोका कायम आहे. त्यामुळे काही जणांना स्थलांतरीत केले आहे. चेंबूरमध्ये मध्यरात्री मुसळधार पावसामुळे दरड भिंतीवर कोसळली. त्यानंतर ही भिंतच घरांवर कोसळली. सकाळी हाती आलेल्या आकडेवारीनुसार, 15 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृत्यूंच्या आकड्यांत वाढ होऊन एकूण २१ जणांचा मृत्यू झाल्याचा अंतिम आकडा समोर आला आहे.

एकूण तीन घरांवर झाड आणि संरक्षक भिंत पडून घरांचे नुकसान झाले आहे. मध्यरात्री 12.30 ते 1 च्या सुमारास हा प्रकार घडला. दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली होती. दरम्यान, विक्रोळीमध्ये एक दुमजली इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. विक्रोळीतील पंचशील नगर भागात दरड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये तिघा जणांचा मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.