प्रियंका गांधींच्या ताफ्यातील चार गाड्यांची एकमेकांना धडक
देश बातमी

प्रियंका गांधींच्या ताफ्यातील चार गाड्यांची एकमेकांना धडक

रामपूर : उत्तर प्रदेशमधील रामपूरच्या दौऱ्यावर गेलेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी यांच्या ताफ्याला अपघात झाला आहे. ताफ्यातील चार गाड्या एकमेकांना धडकल्याचे वृत्त टाइम्स नाऊने दिले आहे. सुदैवाने या अपघातामध्ये प्रियंका थोडक्यात बचावल्या असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. हा अपघात हापुड महामार्गावर गढमुक्तेश्वरजवळ झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

प्रियंका गांधी यांच्या ताफ्यातील गाड्या रामपूरच्या दिशेने निघाल्या होत्या. गाड्यांचा ताफा महामार्गावर वेगाने रामपूरच्या दिशेने जात असतानाच अचानक प्रियंका गांधी ज्या गाडीत बसल्या होत्या ती गाडी तापल्याने तिच्या बोनेटमधून धूर येऊ लागला. त्यामुळे गाडी चालकाने अचानक ब्रेक दाबून गाडी थांबवली. गाडी अचानक थांबल्याने ताफ्यामध्ये मागून येणाऱ्या गाड्यांनी प्रियंका बसलेल्या गाडीला धडक दिली. ताफ्यामधील चार गाड्या एकमेकांना आदळल्या. मात्र या अपघातामध्ये कोणालाही दुखापत झालेली नसल्याचं स्पष्ट करण्यात आळं आहे.

प्रियंका गांधी उत्तर प्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष अजय कुमार लल्लू, विधीमंडळाचे नेते आराधना मिश्रांसहीत अनेक नेते आणि कार्यकर्त्यांबरोबर साडेअकराच्या सुमारास ११ वाजता बिलासपूर येथील डिबडिबा गावाला भेट देणार आहेत. येथे प्रियंका नवरीत सिंह या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना भेट देणार आहेत. २६ जानेवारी रोजी दिल्लीत शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिसेंमध्ये नरवरीतचा मृत्यू झाला. दिस्सीतील आयकर विभाग कार्यालयासमोर ट्रॅक्टर उलटल्याने नवरीतचा मृत्यू झाला. नवरीतचा मृत्यू गोळीबार केल्याने झाल्याचा आरोप आधी शेतकरी आंदोलकांनी केला होता. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये नवरीतला गोळी लागली नसल्याचा खुलासा झाला.