कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत पुन्हा वाढ; मृत्यूंचा आकडा १००पार
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत पुन्हा वाढ; मृत्यूंचा आकडा १००पार

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा मोठ्या प्रमाणावर वाढू लागला असून मृत्यूच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. आज (ता.२३) दिवसभरात राज्यात तब्बल १३२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. राज्यातील मृत्यूदर आता २.१२ टक्क्यांपर्यंत वर गेला आहे. तर रिकव्हरी रेट तब्ल ८८.७३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आजच्या आकडेवारीनुसार, राज्यात दिवसभरात एकूण १३ हजार १६५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, दुसरीकडे एकूण २८ हजार ६९९ नव्या कोरोनाबाधितांची भर देखील पडली आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता २५ लाख ३३ हजार ०२६ इतका झाला आहे. त्यापैकी २ लाख ३० हजार ६४१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे राज्यात आजपर्यंत ५३ हजार ५८९ मृत्यू झाले आहेत.

दरम्यान, राज्य सरकारने नुकतीच कोरोनासंदर्भात नवी नियमावली जारी केली असून त्यानुसार चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मॉल्स, कार्यालये या ठिकाणी ५० टक्के क्षमतेने प्रेक्षक किंवा कर्मचाऱ्यांना परवानगी असेल, असं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील अनेक वेळा नागरिकांना नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे. नियम पाळले नाहीत, तर नाईलाजाने अंतिम उपाय म्हणून लॉकडाऊनचा पर्याय असेल, असा इशारा देखील सरकारकडून देण्यात आला आहे.