नांदेड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा तेराशे पार; दहा जणांचा मृत्यू
कोरोना इम्पॅक्ट बातमी

नांदेड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा तेराशे पार; दहा जणांचा मृत्यू

नांदेड : नांदेड जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 5 हजार 473 अहवालापैकी 1 हजार 330 अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 699 तर अँटिजेन तपासणीद्वारे 631 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 34 हजार 337 एवढी झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत्त रुग्णांची संख्या 668 एवढी झाली आहे. आजच्या 5 हजार 473 अहवालापैकी 4 हजार 38 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 34 हजार 337 एवढी झाली असून यातील 26 हजार 293 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 7 हजार 144 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 59 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 514, अर्धापूर तालुक्यात 14, बिलोली 2, धर्माबाद 2, हिमायतनगर 1, किनवट 10, मुखेड 34, उमरी 1, हिंगोली 2, नांदेड ग्रामीण 26, भोकर 4, देगलूर 4, हदगाव 36, कंधार 12, लोहा 24, नायगाव 11, परभणी 2 असे एकूण 699 बाधित आढळले. आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 374, अर्धापूर तालुक्यात 1, बिलोली 32, धर्माबाद 13, कंधार 7, लोहा 36, मुदखेड 3, नायगाव 8, औरंगाबाद 1, राज्यस्थान 1, परभणी 2, नांदेड ग्रामीण 40, भोकर 1, देगलूर 9, हदगाव 17, किनवट 35, माहूर 11, मुखेड 33, उमरी 5, लातूर 1, हिंगोली 1 असे एकूण 531 बाधित आढळले.

जिल्ह्यात 7 हजार 144 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 226, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 88, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 98, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 31, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 87, मुखेड कोविड रुग्णालय 153, देगलूर कोविड रुग्णालय 52, हदगाव कोविड रुग्णालय 16, लोहा कोविड रुग्णालय 130, कंधार कोविड केअर सेंटर 28, महसूल कोविड केअर सेंटर 126, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 4 हजार 399, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 199, खाजगी रुग्णालय 514 आहेत.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकुण घेतलेले स्वॅब- 2 लाख 80 हजार 973
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 40 हजार 879
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 34 हजार 337
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 26 हजार 283
एकुण मृत्यू संख्या-668
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.57 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-12
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-79
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-411
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-7 हजार 144
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-59.