आरबीआय खरंच 100, 10 आणि 5च्या जुन्या नोटा बाद करणार आहे का? वाचा सत्य!
देश बातमी

आरबीआय खरंच 100, 10 आणि 5च्या जुन्या नोटा बाद करणार आहे का? वाचा सत्य!

नवी दिल्ली : आरबीआय मार्च किंवा एप्रिलपर्यंत 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करणार असल्याच्या बातम्या दोन दिवसांपासून सोशल माध्यमावर जोरदार व्हायरल होत आहेत. गेल्या आठवड्यात अनेक माध्यमांमध्येही तशाप्रकारचं वृत्त झळकलं. सोशल मीडियामध्येही अशा बातम्यांचे अनेक स्क्रीनशॉट, मेसेज व्हायरल झालेत. पण सत्य काय आहे? खरंच नोटा आरबीआय बाद करणार आहे का? यावर सरकारच्या पत्रसूचना विभागाने (पीआयबी)ने स्पष्टीकरण दिलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या वृत्तात कोणतंही तथ्य नाहीये असं पीआयबीकडून सांगण्यात आलं आहे. शिवाय, आरबीआयकडून अशाप्रकारची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही असंही पीआयबीने स्पष्ट केलं आहे. ट्विटरद्वारे पीआयबी फॅक्ट चेकने ही माहिती दिली आहे.

व्हायरल होणाऱ्या खोट्या बातम्यांबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी पीआयबीने पीआयबी फॅक्ट चेक नावाने एक ट्विटर अकाऊंट सुरु केलं असून या अकाऊंटवरुन व्हायरल होणाऱ्या बातम्यांची सत्यता पताळून त्यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं जातं.

पीआयबी फॅक्ट चेक केंद्र सरकारच्या पॉलिसी/योजना/विभाग/ मंत्रालयांविषयी चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी कार्य करते. सरकारशी संबंधित कोणतीही बातमी सत्य किंवा असत्य आहे हे जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेतली जाऊ शकते. कोणीही PIB Fact Checkला संशयास्पद बातमीचा स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा युआरएल व्हॉट्सअप नंबर 918799711259 वर पाठवू शकतं. यशिवाय, pibfactcheck@gmail.com या ईमेल आयडीवर मेल देखील करु शकतात.