राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत आणखी घट; रिकव्हरी रेट ९४ टक्के
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत आणखी घट; रिकव्हरी रेट ९४ टक्के

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका टळला नसून राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. महाराष्ट्रात मागील २४ तासांत ३ हजार ८८० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या १८ लाख ८४ हजार ७७३ झाली आहे. तर राज्यात आजघडीला ६० हजार ९०५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्याचबरोबर दिवसभरात ४ हजार ३५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत १७ लाख ७४ हजार २५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.१४ टक्के इतके झाले आहे. तसेच, राज्यात आज ६५ मृत्यूंची नोंद झाली आहे. आज घडीला मृत्यूदर २.५७ टक्के इतका झाला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत एकूण १ कोटी १९ लाख ३३ हजार ९५६ कोरनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर सध्या राज्यात ५ लाख ६ हजार ९१४ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. त्याचबरोबर ४ हजार ३३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.