राज्यात आज जवळपास ५ हजार नव्या रुग्णांची नोंद; तर एवढ्या रुग्णांना डिस्चार्ज
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात आज जवळपास ५ हजार नव्या रुग्णांची नोंद; तर एवढ्या रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई : आज राज्यात ४ हजार ९३० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ९५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा २.५८ टक्के इतका आहे. त्याचबरोबर आज महाराष्ट्रात ६ हजार २९० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर राज्यात आजपर्यंत एकूण १६ लाख ९१ हजार ४१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९२.४९ टक्के इतका झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या एकूण १ कोटी ९ लाख १५ हजार ६८३ नमुन्यांपैकी १८ लाख २८ हजार ८२६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ३८ हजार ८४ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ६ हजार २४० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. आज घडीला राज्यात ८९ हजार ९८ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

राज्यातील एकूण रुग्णांची संख्या आता १८ लाख २८ हजार ८२६ झाली आहे. आज नोंद झालेल्या ९५ मृत्यूंपैकी ३२ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर २० मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत. उर्वरित ४३ मृत्यू हे एक आठवड्यापूर्वीच्या कालावधीतले आहेत अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.