अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांच्याकडून महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा
देश बातमी

अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांच्याकडून महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प आज संसदेत सादर करत आहेत. निर्मला सीतारामन यांनी सुरुवातीला केंद्र सरकारने कोरोना संकटात केलेल्या मदतीची माहिती दिली. महाराष्ट्रासाठी निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली असून नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. तसंच लवकरच करोना प्रतिबंधक आणखी दोन लस उपलब्ध होणार असल्याचं सांगितलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचाही हा तिसरा अर्थसंकल्प आहे. तसंच पहिल्यांदाचा पेपरलेस बजेट सादर केलं जात असून मेक इन इंडिया टॅबचा वापर केला जात आहे. त्याचबरोबर, यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी कोरोना लसीविषयी मोठी घोषणा केली आहे. कोरोनाचा जगावर मोठा परिणाम झाला असून कोरोना साथीला सामोरे जाण्यासाठी भारताने मोठी पावले उचलली आहेत. कोरोना लसीकरणासाठी या अर्थसंकल्पात 35,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

सरकारने आरोग्य आणि आरोग्य क्षेत्रातचं बजेट 94 हजार कोटी रुपयांवरून 2.38 लाख कोटी रुपये केलं आहे. या माध्यमातून देशातील सर्व लोकांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यात येतील. असही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितले. तसेच, केंद्र सरकारने 100 हून अधिक देशातील लोकांना कोरोनाविरुद्ध सुरक्षा प्रदान केली आहे. पंतप्रधानांनी वैज्ञानिकांना श्रेय देत या लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात केली. भारत खरोखरच शक्यता आणि अपेक्षेचा देश होण्यासाठी तयार आहे, असं निर्मला सीतारमण यांनी म्हटलं.