राज्यात दिवसभरात ५१९ रुग्णांचा मृत्यू; तर एवढ्या नवीन रुग्णांची नोंद
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यात दिवसभरात ५१९ रुग्णांचा मृत्यू; तर एवढ्या नवीन रुग्णांची नोंद

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना दिसत नाही. दररोज रुग्णांची संख्या वाढतानाच दिसत आहे. राज्यात गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ५१९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं असून दिवसभरात एकूण ६२ हजार ९७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आजपर्यंत राज्यात सापडलेल्या एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ३९ लाख ६० हजार ३५९ इतका झाला आहे. त्यासोबतच एकूण मृतांचा आकडा देखील ६१ हजार ३४३ इतका झाला आहे. राज्यात आज दिवसभरात एकूण ५४ हजार २२४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे रिकव्हरी रेट वाढणं अपेक्षित आहे. मात्र, दुसरीकडे नवे कोरोनाबाधित सातत्याने वाढत असल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट सातत्याने खाली येऊ लागल्याचं गेल्या महिन्याभरात दिसून आलं आहे. सध्या राज्यात एकूण ६ लाख ८३ हजार ८५६ अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.

केवळ पुण्यात ५५ मृ्त्यूची नोंद
मागील २४ तासांत पुणे शहरात दिवसभरात ५ हजार १३८ कोरोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर ३ लाख ७६ हजार ९६२ इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान ५५ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या ६ हजार २१८ झाली. त्याच दरम्यान ६ हजार ८०२ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर ३ लाख १७ हजार ७६७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.