पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली कोरोना लसीची किंमत
कोरोना इम्पॅक्ट बातमी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितली कोरोना लसीची किंमत

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासूनच कोरोनाची लस कधी येणार हा प्रश्न प्रत्येकजणांसमोर होता. आता लस टप्प्यात दिसत आता सुरुवातीला लस कोणाला मिळणार? तिची किंमत काय असणार? असा प्रश्न पडत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी यावर भाष्य केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, सध्या जगभरात विविध कंपन्या कोरोनावरील लस वितरित करताना दिसत आहेत. त्या लसींची किंमत तुलनेने जास्त आहे. सर्व जग सध्या वाजवी दरातील परिणामकारक लसीची वाट पाहत आहेत. त्यामुळे साऱ्या जगाचे लक्ष भारतात चालू असलेल्या संशोधनाकडेदेखील आहे. भारतात सुरू असलेलं संशोधन आता काही आठवड्यांत पूर्ण होईल आणि त्यानंतर लगेच संशोधकांनी हिरवा कंदील दाखवल्यावर लसीचे वितरण सुरू होईल. लसीची किंमत किती असेल? असा प्रश्न स्वाभाविक आहे. केंद्र सरकार यासंदर्भात राज्य सरकारांशी चर्चा करत आहे. लसीची किंमत ही जनस्वास्थ्याला प्राथमिकता देऊनच निश्चित केली जाईल आणि राज्य सरकार या निर्णयप्रक्रियेत सहभागी असेल, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

देशातील करोनाची सद्यपरिस्थिती या विषयावर आज सर्वपक्षीय बैठक झाली. त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान मोदी होते. या बैठकीत सरकारकडून नजीकच्या भविष्यकाळात करोनाच्या लसीचे वितरण करण्याबाबत चर्चा झाली. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झाली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित करत कोरोना लस कधी मिळेल आणि त्याची किंमत किती असेल यासंदर्भात त्यांनी वरील माहिती दिली आहे.