INDvsENG : भारताची पहिल्या डावात ३६४ धावांपर्यंत मजल
क्रीडा

INDvsENG : भारताची पहिल्या डावात ३६४ धावांपर्यंत मजल

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताने पहिल्या डावात ३६४ धावांपर्यंत मजल मारली आहे. पहिल्या दिवशी भारताने ३ बाद २७६ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यानंतर केएल राहुल बाद झाला आणि इतर फलंदाजांनी त्याच्या पाठी तंबूत परतण्याची रांग लावली. दुसऱ्या दिवशी भारताने ८८ धावांत ७ गडी गमावले. इंग्लंडच्या जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनने ५ गडी बाद केले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

लॉर्ड्स कसोटीत नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रूटने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण त्याचा निर्णय रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी चुकीचा ठरवला. रोहितने आक्रमक दृष्टिकोन स्वीकारला आणि राहुलने त्याला साथ दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली. ८३ धावांवर रोहित अँडरसनचा बळी ठरला. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या पुजाराला फारसे काही करता आले नाही आणि तो स्वस्तात बाद झाला.

पुजारा बाद झाल्यानंतर राहुलने कोहलीसह भारतीय डावाची धुरा सांभाळली आणि या दरम्यान राहुलने लॉर्ड्सवर आपले पहिले शतक झळकावले. विराट पूर्णपणे सेट दिसत होता आणि प्रत्येकाला त्याच्याकडून मोठ्या इनिंगची अपेक्षा होती, पण तो ४२ धावांवर रॉबिन्सनचा बळी ठरला.