साताऱ्यात पेट्रोलने भरल्या विहीरी; शेतकरी त्रस्त
पश्चिम महाराष्ट्र बातमी

साताऱ्यात पेट्रोलने भरल्या विहीरी; शेतकरी त्रस्त

सातारा : पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले असून सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसत आहे. अशातच सातारा जिल्ह्यात पेट्रोल चोरीची एक घटना घडली आहे. फलटण येथील पेट्रोल चोरीसाठी चोरट्यांनी चक्क पेट्रोल वाहून नेहणारी उच्च दाबाची पाइपलाइन फोडली आणि दोन हजार लिटर पेट्रोल लंपास करण्यात आलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हिंदुस्थान पेट्रोलियमच्या मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावरील २२३ किलोमीटरच्या पाइपलाइनला साताऱ्यातील सासवड गावाजवळ मोठं भगदाड पाडलं. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा घटनास्थळी धाव घेत भगदाड बंद करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही.

मात्र पाइपलाइन फोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पेट्रोल वाहून गेलं. लाखो रुपयांचं हजारो लिटर पेट्रोल जमिनीत मुरल्यामुळे या भागातील विहिरी पेट्रोलनी भरल्या आहेत. तसंच जमिनीत मुरलेल्या प्रेट्रोलमुळे अनेक एकर शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झालं आहे. विहिरीतील मासे आणि बेडूक, तसंच परिसरातील साप मृत झाल्याचं दिसून आल्यानंतर हा प्रकार समोर आला. या भागातील लोकांनी शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं आहे.