अंबाजोगाई न्यायालयाकडून करुणा शर्मा यांना जामीन मंजूर
बातमी मराठवाडा

अंबाजोगाई न्यायालयाकडून करुणा शर्मा यांना जामीन मंजूर

बीड : अंबाजोगाई सत्र न्यायालयाने अखेर करुणा शर्मा यांची सुटका केली आहे. २५ हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना न्यायालयाकडून जामीन देण्यात आला आहे. जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा न्यायालयीन कोठडीत होत्या.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काही दिवसांपूर्वी करूणा शर्मा परळीत दाखल झाल्यानंतर त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांना अंबाजोगाई न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणात या प्रकारामुळे मोठी चलबिचल पाहायला मिळाली होती.

सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कथित आरोप करणाऱ्या करुणा शर्मा काल रविवारी परळीत दाखल झाल्या होत्या. यावेळी पोलिसांनी केलेल्या तपासणीत त्यांच्या वाहनामध्ये पिस्तूल आढळून आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. तर, समाज माध्यमातून धनंजय मुंडेंच्या विरोधातील सर्व पुरावे जाहीर करण्याचा इशारा देऊन करुणा या परळीत दाखल झाल्या होत्या.