ब्रेक द चेन अंतर्गत नवीन नियमावली जाहीर; पुण्यासह ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम
बातमी महाराष्ट्र

ब्रेक द चेन अंतर्गत नवीन नियमावली जाहीर; पुण्यासह ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम

मुंबई : राज्य सरकारने राज्यातील नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने अनलॉकबाबतची नवी नियमावली आज जाहीर केली आहे. सांगलीत मुख्यमंत्र्यांनी पत्रकारपरिषदेत सांगितल्याप्रमाणे दुकांनाच्या वेळा वाढवण्यात आल्या आहेत. या नव्या नियमावलीनुसार सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजेपर्यंत तर, शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत दुकानं सुरू राहणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या अनलॉकच्या नव्या नियमावलीकडे अवघ्या राज्याचं विशेष करून व्यापाऱ्याचं जास्त लक्ष लागलेलं होतं. यामुळे राज्यभरातील जवळपास २५ जिल्ह्यांना दिलासा मिळणार आहे. तर, ज्या भागात सध्या करोनाबाधितांची संख्या वाढत आहे, तिथे हा दिलासा नसणार आहे. मुख्यमंत्र्यांनी ही देखील माहिती आज दुपारी दिली होती. त्यामुळे ज्या ठिकाणी रूग्ण कमी होत आहेत तिथल्या नागरिकांसाठीच हा दिलासा असणार आहे. पुणे, साताऱ्यासह ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम असणार आहेत.

राज्यातील कोविड संसर्ग मोठ्या प्रमाणावर असलेल्या ११ जिल्ह्यांत ब्रेक दि चेन अंतर्गत तिसऱ्या पातळीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले असून मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे या ३ जिल्ह्यांत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्बंधांबाबत ठरविणार आहे. अशा रीतीने हे १४ जिल्हे सोडून राज्यातील उर्वरीत जिल्ह्यांमध्ये निर्बंधांमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे.

या ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम
१) कोल्हापूर
२) सांगली
३) सातारा
४) पुणे
५) रत्नागिरी
६) सिंधुदुर्ग
७) सोलापूर
८) अहमदनगर
९) बीड
१०) रायगड
११) पालघर