राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत आणखी घट; २४ तासात ७ हजारांपेक्षा जास्त डिस्चार्ज
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत आणखी घट; २४ तासात ७ हजारांपेक्षा जास्त डिस्चार्ज

मुंबई : ब्रिटनमध्ये नवीन प्रकारच्या कोरोनाचा धोका वाढला असला तरी महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात का होईना कमी झाल्याचे दिसत आहे. मात्र कोरोनाचा धोका आणखीही टळलेला नाही. म्हणून नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असून राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसत आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मागील २४ तासात राज्यात ७ हजार ६२० कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिवसभरात राज्यात आज 3913 कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी झाली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 18 लाख 01 हजार 700 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात आता केवळ 54 हजार 573 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.51% झाले आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

त्याचबरोबर मागील २४ तासांमध्ये ९४ मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत एकूण ४८ हजार ९६९ मृत्यू करोनामुळे झाला आहे.