ओबीसी आरक्षण प्रश्नांसाठी होणारा नाना पटोलेंचा बारामती दौरा रद्द
बातमी महाराष्ट्र

ओबीसी आरक्षण प्रश्नांसाठी होणारा नाना पटोलेंचा बारामती दौरा रद्द

पुणे : ओबीसी-समाज आरक्षण प्रश्नी महाराष्ट्रातील सामाजिक संघटना व कार्यकर्ते यांचा ऊद्या (ता. २९) गुरुवारी बारामतीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या ऊपस्थितीत होणाऱ्या पुर्व नियोजीत महामोर्चास कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्त मदत पुनर्वसनाच्या कार्यामुळे पोहोचणे अशक्य असल्याचे, प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ओबीसी आरक्षण प्रश्न राज्यातील पुरपरीस्थिती आटोक्यात आल्यावर लवकरच घेण्यात येईल व तसे संबंधितांना प्रदेश काँग्रेसकडून कळविण्यात येईल असेही गोपाळ तिवारी यांनी सांगीतले आहे. ओबीसी व धनगर समाजाचे प्रश्न आपल्यासाठी प्राधान्यक्रम आहे, परंतू या पुरआपत्ती प्रसंगी आपत्तीग्रस्तांना मदतीची गरज अधिक आहे. त्यामुळे सदर बारामती दौरा रद्द करावा लागत आहे, किंबहूना सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या प्रसंगी पुरग्रस्तांच्या मदतीस घावून जाणे महत्वाचे असून, सर्वांनी आपत्ती ग्रस्तांना मदत करावी असे आवाहन करत असल्याचे देखील नाना पटोले यांनी कळवल्याचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी सांगितले आहे.