एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार : अमित देशमुखांचे स्पष्टीकरण
बातमी महाराष्ट्र

एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार : अमित देशमुखांचे स्पष्टीकरण

मुंबई : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात येत्या ८ मार्चपासून सुरु होणारी एमबीबीएस अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्यावी, अशी मागणी अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठ व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे. मात्र या परीक्षा ऑनलाइन घेणे शक्य नसून या व पुढील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुद्धा ऑफलाईन घेतल्या जाणार आहेत. अशी माहिती मंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोना पॉझिटिव्ह असल्याने विद्यार्थी परीक्षा कशी देणार? अकोला, अमरावती, नागपूर व विदर्भातील जिल्ह्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे, ते विद्यार्थी परीक्षा कशी देणार असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून या परीक्षा ऑनलाइन घेण्यात याव्यात अशी मागणी मेडिकलच्या विद्यार्थ्यांकडून वारंवार करण्यात आली आहे. याबाबत अनेक पत्र विद्यापीठ प्रशासन व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना पाठवण्यात आले होते. मात्र, त्यानंतर सुद्धा 8 मार्च पासून सुरू होणारी एमबीबीएस अंतिम वर्ष परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनेच घ्यावी लागणार असल्याचे विद्यापीठकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच, राज्यातील अनेक असे केंद्र, महाविद्यालय आहेत जिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही. यामुळेही ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नसल्याचे मंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक अजित पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली किंवा ज्या विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची लक्षण दिसतील अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर आयसोलेशन रूमची वेगळी व्यवस्था प्रत्येक परीक्षा केंद्रावर केली जाणार आहे.