संजय राठोडांचा राजीनामा राज्यपालांपर्यंत पोहचलाच नाही? पण का?
राजकारण

संजय राठोडांचा राजीनामा राज्यपालांपर्यंत पोहचलाच नाही? पण का?

पूजा चव्हाण प्रकरणी शिवसेना नेते संजय राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. रविवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही राठोड यांचा राजीनामा फ्रेम करण्यासाठी नाही, असं म्हणत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र, संजय राठोड यांचा राजीनामा अद्याप राज्यपालांकडे पोहोचलाच नसल्याचं वृत्त समोर आले आहे. त्यामुळे आता राठोड यांच्या राजीनाम्याचं पुढे काय झालं. राठोड अजूनही मंत्रीपदी कसे? असे सवाल उपस्थित होऊ लागले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, २८ फेब्रुवारी रोजी संजय राठोड राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्यावर कार्यवाही होणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. “राजीनामा फ्रेक करुन लावण्यासाठी घेतला नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. मात्र, राजीनामा घेऊन दोन-तीन दिवस झाले तरी संजय राठोड यांचा राजीनामा अजूनही राज्यपालांकडे का पाठवण्यात आला नाही. त्यामुळे राठोड कायदेशिरदृष्ट्या अजूनही मंत्रिपदी कायम आहेत. तर दुसरीकडे राठोड यांच्या राजीनाम्याचं पुढे काय झालं, असे अनेक सवाल उपस्थित होऊ लागले आहेत.

टाईम्स ऑफ इंडिया’ने संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे आलेला नसल्याचं वृत्त राजभवनातील सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. तर सध्या पूजा चव्हाण प्रकरणाचा तपास सुरू आहे. या प्रकरणावरून राठोड यांच्यावर आरोप झालेले असून, अहवाल आल्यानंतर राठोड यांना पुन्हा मंत्रीपद दिलं जाऊ शकतं किंवा त्यांच्याकडे दुसरं खातं दिलं जाऊ शकतं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संजय राठोड यांचा राजीनामा महिना अखेरीपर्यंत स्वतःकडेच ठेवू शकतात, असे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने शिवसेना नेत्याने दिलेल्या हवाल्याने दिले आहे.