Video : भाजप खासदाराची समाजसेवा! ब्रश न मिळाल्यानं हातानं स्वच्छ केलं कोविड टॉयलेट
देश बातमी

Video : भाजप खासदाराची समाजसेवा! ब्रश न मिळाल्यानं हातानं स्वच्छ केलं कोविड टॉयलेट

नवी दिल्ली : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते अजब गजब वक्तव्य करत असताना मध्य प्रदेशातील भाजपचे खासदार जनार्दन मिश्रा यांनी कोविड सेंटरला दिलेल्या भेटीदरम्यान तेथील शौचालय अस्वच्छ दिसल्यानं स्वतः च्या हातानं स्वच्छ केलं आहे. त्यांच्या या कारनाम्यामुळे त्यांची सोशल मीडियात जोरात चर्चा सुरू आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मध्य प्रदेशातील रीवा लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले मिश्रा सोमवारी मऊगंज जनपद तालुक्यात दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी तालुक्यातील विविध कोविड केंद्रांना भेटी दिल्या आणि परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान त्यांनी कुंज बिहारी येथील कोविड सेंटरलाही भेट दिली. यावेळी येथील शौचालय अस्वच्छ असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं. पण त्यानंतर त्यांनी गांधीगिरी करत स्वतः शौचालय स्वच्छ करायला घेतलं.

यावेळी त्यांना शौचालय स्वच्छ करण्याचा ब्रश न मिळाल्यानं त्यांनी हातात हातमोजे घालून शौचालय साफ केलं आहे. यावेळी त्यांचे अनेक कार्यकर्ते त्याठिकाणी उपस्थित होते. यातील एका कार्यकर्त्यानं या घटनाक्रमाचा व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड केला आहे.