बातमी मराठवाडा

डॉ.सुनील गायकवाड अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या जीवन गौरव पुरस्काराने सम्मानित

गोवा : पणजी येथे संसदरत्न लातूरचे मा. खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदे चा मानाचा आणि प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय “जीवन गौरव पुरस्कार” आज गोवा येथे शानदार कार्यक्रमा मध्ये परिषदेचे राष्ट्रिय अध्यक्ष शरद गोरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विद्यचे व संस्कृती चे माहेरघर असलेल्या पुण्य नगरीत साहित्यिकाना व्यासपीठ मिळावे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ची स्थापना झाली असून परिषदेच्या वतीने शिक्षण, साहित्य, कला, प्रशासकिय सेवा,कृषी उद्योग,कायदा, आरोग्य अशा विविध क्षेत्रात यशस्वी व विधायक आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एका व्यक्तीला व संस्था ना परिषदेच्या वतीने गौरविण्यात येत असते.
गेली अनेक वर्षे मा. खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी आपला व्यवसाय सांभाळून

सामाजिक बांधिलकी जोपासून अनेक समाजहित कामे केले आहेत.सामाजिक उपक्रमाला त्यांनी प्रोत्सान दिले आहे. सोळाव्या लोकसभेत उच्च शिक्षित खासदार म्हणून नुकतेच हाई रेंज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये त्यांची नोंद झाली असून त्यांना तसे प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यांनी अनेक विषयात उच्च पदवी घेतल्या घेतल्या असून त्यांचे अनेक पुस्तके प्रकाशित झाले आहेत. ते कवी,लेखक,पत्रकार, राजकारणी अशा विविध भूमिका पार पाडत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय “जीवन गौरव” पुरस्कार देऊन दि.१० ऑक्टोबर २०२१ रोजी गोवा येथे शानदार कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.

विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर गोवा येथे संपनं झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रामुख्याने स्वागत अध्यक्ष माणिक राठोड, महासचिव ॲड.अविनाश अवटे, भाजपा युवा मोर्चा महामंत्री राहुल लोणीकर,अनिल खंदारे सूत्र संचालन कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज, गणराज्य संघ चे लातूर जिल्हा अध्यक्ष रामलिंग पटसालगे, आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *