मुकेश अंबानी प्रकरण: गाडीत मिळालेल्या धमकीच्या पत्राचा तपास एटीएस करणार
बातमी मुंबई

मुकेश अंबानी प्रकरण: गाडीत मिळालेल्या धमकीच्या पत्राचा तपास एटीएस करणार

मुंबई : देशातील प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 26 फेब्रुवारी रोजी स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. या गाडीत धमकीचं पत्रही मिळाल असून त्यात अंबानींच्या संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे सोपविण्यात आला होता. आता धमकीचाही तपास एटीएसकडे देण्यात आला आहे. फडणवीस यांनी या प्रकरणात एनआयए चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने शिफारस करावी अशी मागणी विधानसभेत केली होती.

याबाबत बोलताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले होते की, ”या प्रकरणाचा तपास करण्यास महाराष्ट्र पोलीस यंत्रणा सक्षम आहे त्यामुळे हा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या ‘एटीएस’कडून करण्यात येईल. तसेच या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.

तर, घरगुती वापराकरता ती मी गाडी विकत घेतली असल्याचं मनसुख हिरेन यांनी सांगितलं. मात्र या सर्व घटना क्रमाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शंका व्यक्त केली आहे. त्याचं स्टेअरिंग जॅम झालं, त्यानंतर ते क्रॉफर्ड मार्केटला जाऊन भेटले. कोणाला भेटले? सचिन वाझे आणि त्यांचे टेलिफोन संवाद होते. जो या प्रकरणातला दुवा होता, त्याची बॉडी सापडली आहे. मी मृतदेह पाहिला, हात मागे बांधले आहेत असं कोणी आत्महत्या करत नाही. इतके योगायोग होत नाहीत. तात्काळ हे प्रकरण एनआयएकडे दिलं पाहिजे, असं यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तसंच गृहमंत्री यांच्या बोलण्यात आणि पोलीस जबाबात तफावत असल्याचं सांगत कोणी पोहोचायच्या आत सचिन वाझे कसे पोहोचले? क्रॉफर्ड मार्केटला भेटलेला व्यक्ती कोण? असे प्रश्न उपस्थित केले.