हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट; निर्मात्यासह अभिनेत्रीचा समावेश
बातमी मुंबई

हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट; निर्मात्यासह अभिनेत्रीचा समावेश

मुंबई : हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा मुंबईतील जुहू परिसरात पर्दाफाश करण्यात आला आहे. या रॅकेट प्रकरणी निर्माता प्रेम उर्फ संदीप इंगळे अभिनेत्री तान्या शर्मा आणि मेकअप आर्टिस्ट हनुफा उर्फ तन्वी सरदार या तिघांचे नाव समोर आले आहे. या प्रकरणाचा पर्दाफाश गुप्तवार्ता पथकाचे पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि त्यांच्या टीमने केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अभिनय क्षेत्रात काम करू इच्छीणाऱ्या 8 अभिनेत्री आणि मॉडेल्सची गुप्तवार्ता पथकाने सुटका केली. शिवाय निर्मात्यासह तान्या आणि मेकअप आर्टिस्टला देखील अटक केली आहे. कॅलेंडर शूट, वेबसीरिज तसेच चित्रपटात भूमिका मिळवून देण्याच्या बहाण्याने या तरुणींकडून देहव्यापार करून घेतला जात असल्याचे समोर आले आहे.

संदीप इंगळे, तान्या शर्मा, तन्वी सरदार हे तिघे हा रॅकेट गेल्या पाच वर्षांपासून चालवत आहे. या तिन्ही आरोपींना 22 जानेवारीपर्यंत कोठडीत ठेवण्यात येणार आहे. तरुणी पुरविण्यासाठी त्यांनी काही संकेतस्थळांचाही वापर केल्याचे समोर आलं आहे. शिवाय या रॅकेटमध्ये आणखी मॉडेलिंग क्षेत्रात बड्या व्यक्तींचा सहभाग आढळण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.