आयसीसीच्या सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारावर ‘या’ खेळाडूचा कब्जा
क्रीडा

आयसीसीच्या सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारावर ‘या’ खेळाडूचा कब्जा

कराची : आयसीसीच्या सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारावर पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम यांने कब्जा केला आहे. आझमला आयसीसीच्या एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध नुकत्याच पार पडलेल्या मालिकेत आझमने चांगली कामगिरी केली होती. त्याने आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत ९४ धावांची खेळी केली. या खेळीमुळे त्याला १३ रेंटिग गुण मिळाले. या गुणांसह त्याने भारताच्या विराट कोहलीला मागे टाकत एकदिवसीय क्रमवारीत पहिले स्थान मिळवले.

महिलांमध्ये हिलीला पुरस्कार
महिलांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हिलीने महिलांमध्ये एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार नावावर केला. हिलीने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यात ५१.६६च्या सरासरीने १५५ धावा केल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ती सर्वाधिक धावा करणारी फलंदाज होती. पुरुष आणि महिला अशा दोन्ही प्रवर्गातील तीन उमेदवारांना मैदानातील कामगिरीच्या आधारे निवडले जाते. त्यानंतर या खेळाडूंसाठी स्वतंत्र आयसीसी मतदान अकादमीद्वारे मतदान केले जाते.

आयसीसीने या पुरस्काराद्वारे यावर्षी जानेवारीपासून महिन्यातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूची निवड करण्यास सुरूवात केली. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने सर्वप्रथम हा पुरस्कार पटकावला होता. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विनला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे महिन्यातील सर्वोत्कृष्ट क्रिकेट म्हणून निवडण्यात आले. मार्च महिन्यात भुवनेश्वर कुमारने या पुरस्कारावर नाव कोरले. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेमध्ये भुवनेश्वरने किफायतशीर गोलंदाजी केली होती.