मोदींच्या मुख्य सल्लागारांचा तडकाफडकी राजीनामा
देश बातमी

मोदींच्या मुख्य सल्लागारांचा तडकाफडकी राजीनामा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सल्लागार पी के सिन्हा यांनी आज (ता. १६) तडकाफडकी राजीनामा दिला. खासगी कारणामुळे सिन्हा यांनी राजीनामा दिल्याचं म्हटलं जात आहे. आजचा सिन्हा यांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस ठरला आहे. उद्यापासूनच म्हणजेच बुधवारपासून सिन्हा कायमच्या रजेवर जाणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कॅबिनेट सेक्रेटरी पदावरून निवृत्त झाल्यानंतर पी के सिन्ह यांना पंतप्रधान मोदींनी मुख्य सल्लागार म्हणून नियुक्त केलं होतं. ११ सप्टेंबर २०१९ पासून त्यांनी पंतप्रधानांच्या मुख्य सल्लागार पदाची जबाबदारी स्वीकारली होती. या अगोदर सिन्हा यांनी १३ जून २०१५ ते ३० ऑगस्ट २०१९ पर्यंत चार वर्ष मंत्रिमंडळ सचिव म्हणून काम केलं होतं.

ते उत्तर प्रदेश कॅडरचे १९७७च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी होते. त्यांनी या अगोदर पंतप्रधान कार्यालयात ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी म्हणूनही काम केलेलं आहे. याशिवाय ते ऊर्जा मंत्रालयात सचिवपदी देखील कार्यरत होते.