दीड कोटींचा पकडला गांजा; सात महिलांसह २६ जणांना अटक
देश बातमी

दीड कोटींचा पकडला गांजा; सात महिलांसह २६ जणांना अटक

नवी दिल्ली : ओडिशामध्ये तब्ल दीड कोटींचा गांजा पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हा गांजा इतर राज्यात पाठवणार होते, असं पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी गजपती जिल्ह्यातून सात महिलांसह २६ जणांना अटक केली आहे. एकूण २१ क्विंटल गांजा असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सर्व आरोपी हा गांजा चार छोट्या मालवाहू वाहनांमधून राज्याबाहेर पाठवण्याच्या तयारीत होते. याप्रकरणी २६ जणांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये सात महिलांचा समावेश आहे,” अशी माहिती आर उदयगिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीपकुमार नायक यांनी दिली.

पोलिसांनी आरोपींविरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.