पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई; २ जण ताब्यात
पुणे बातमी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई; २ जण ताब्यात

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राजकीय विश्वात खळबळ उडाली आहे. मात्र या प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी यवतमाळ आणि बीडमधून दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. या दोन्ही तरुणांची कसून चौकशी केली जाणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या प्रकरणी नेमण्यात आलेल्या पोलीस पथकाच्या टीमने यवतमाळ आणि बीडमध्ये जाऊन दोन जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये एक जण हा अरुण राठोडचा नातेवाईक असल्याची माहिती मिळत आहे. तसेच, अरुण राठोड हा गेल्या काही दिवसांपासून गायब आहे. कथित ऑडिओ क्लिपमध्ये अरुण राठोडचा आवाज असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजाचा मित्र अरुण राठोड हा बीड जिल्ह्यातील परळीच्या धारावती तांडा येथे राहतो. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात व्हायरल क्लिपमुळे अरुणचं नाव आल्यानंतर त्याच्या घराला गेल्या काही दिवसांपासून कुलूप लावण्यात आलेलं होतंया प्रकरणातील संशयित अरुण राठोड याचं कुटुंब चार दिवसानंतर गावात आलं. मात्र, त्यांच्यासोबत अरुण आलेला नाही. तो अजूनही गायबच आहे. या विषयी अरुणची आई मीराबाई राठोड यांनी याबाबत खुलासा केला असून मीराबाई यांनी त्या ऑडिओ क्लिप मधील संभाषण हे अरुण राठोड व कथित मंत्री यांचे नसल्याच्या दावा या वेळी केला असून सध्या अरुण कुठे आहे हे त्यांनादेखील माहित नसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणात तब्बल 12 ऑडिओ क्लीप समोर आल्या आहेत. ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळीच भाजपच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने अरूण राठोडकडून या ऑडिओ क्लीप काढून घेतल्याचं समोर येत आहे. तसेच त्याचवेळी त्यांच्या फोटो आयडीचे फोटो काढून घेतल्याचं सांगितलं जात आहे. त्यातून या क्लीप नेमक्या कशा बाहेर आल्या याबाबत विचारणा केली जात आहे. पण या प्रकरणी आता दबाव एवढा वाढू लागला आहे.