ही दुकानेही उघडणार; अत्यावश्यक सेवेत नव्याने समावेश
देश बातमी

ही दुकानेही उघडणार; अत्यावश्यक सेवेत नव्याने समावेश

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी करण्यात आली आहे. मात्र, पावसाळा तोंडावर आल्याने बांधकाम व्यवसाय व्यापार्‍यांकडून बांधकाम क्षेत्रातील दुकानं सुरु ठेवण्याची विनंती केली होती. त्यानुसार आता राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बांधकाम साहित्याशी संबंधित दुकानांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश केला असून, पावसाळा तोंडावर आल्याने नागरिकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नुकत्याच झालेल्या नुकतेच चक्रीवादळामुळे कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये घरांची पडझड आणि नुकसान झाले आहे. कोणतीही नैसर्गिक आपत्ती किंवा संकटात प्रभावीपणे मदत करू शकतील, अशा साहित्यांची दुकाने, व्यवसाय सुरू करण्यास सरकारने परवानगी देऊ केली आहे. आता शहरांमध्ये हार्डवेअर व पावसाळी साहित्याची दुकानं सुरू करता येणार आहेत. अन्य आवश्यक व्यवसायांसाठी दिलेल्या वेळेत ही दुकानं सुरू राहतील मात्र कोविड नियमांचे पालन न केल्यास दुकानदारांना 10 हजार रुपयांचा दंड करणार असल्याचेही सांगितले आहे.

कोणकोणती दुकाने उघडणार
छत्र्या, ताडपत्री आणि रेनकोटची दुकाने उघडण्याचीही परवानगी दिली आहे. या दुकानांचा अत्यावश्यक दुकानांच्या यादीत समावेश केला असल्याने शासनाने अन्य दुकांनाना घालून दिलेल्या वेळेत ही दुकाने चालू करता येणार आहेत.