उदयनराजेंनी घेतली शरद पवारांची भेट; म्हणाले आता तुम्हीच वडिलकीच्या नात्याने…
राजकारण

उदयनराजेंनी घेतली शरद पवारांची भेट; म्हणाले आता तुम्हीच वडिलकीच्या नात्याने…

नवी दिल्ली : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी ‘मराठा आरक्षणाबाबत वकिलांकडून कोर्टात योग्य मांडणी झाली नाही. सरकारनं लवकर तोडगा काढावा अन्यथा उद्रेक होईल’ अशा इशारा ठाकरे सरकारला दिला आहे. तसंच शरद पवारांनी वडिलकीच्या नात्यानं यात लक्ष घालावे’ अशी विनंतीही उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नवी दिल्लीतील शरद पवार यांच्या निवास्थानी जाऊन उदयनराजेंनी भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. मराठा आरक्षण संदर्भात राज्य सरकारने श्वेत पत्रिका सादर करावी. मराठा आरक्षण संदर्भात सरकार गंभीर नाही. वकिलांनी सुप्रीम कोर्टात योग्य बाजू मांडली नाही’ असा आरोप उदयनराजे यांनी केला. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीच्या वेळी उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली होती. त्यानंतर, आज पहिल्यांदाच उदयनराजे हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले होते.

भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर उदयनराजे यांनी शरद पवार यांच्यावर टीका करण्याचे टाळले होते. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी उदयनराजे यांनी शरद पवार यांच्यासोबत असलेला फोटो फेसबुक पेजवर अपलोड करून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या होत्या. संपूर्ण वर्षभरात दोन्ही नेत्यांमधील एवढाच तो संवाद होता. आता मराठा आरक्षणाच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांची भेट झाली.