पबजीच्या नादात मुलाने गमावले 10 लाख रुपये
देश बातमी

पबजीच्या नादात मुलाने गमावले 10 लाख रुपये

नवी दिल्ली : पबजी गेमच्या नादात एका 16 वर्षाच्या मुलाने आपल्या आई-वडिलांच्या खात्यातून तब्बल 10 लाख रुपये ट्रान्सफर केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. इतकी मोठी रक्कम, पैसे ट्रान्सफर झाल्याचं समजल्यानंतर मुलगा घरातून फरार झाला. परंतु मुंबई क्राईम ब्रांचच्या मुस्कान यूनिटला मुलगा घरापासून काही अंतरावर आढळला. त्यानंतर त्याला ठाण्यात नेऊन त्याचं काउंसलिंग करण्यात आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुंबई क्राईम ब्रांचने घरातून पळून गेलेल्या या मुलाला ट्रेस केलं आणि शोधून काढलं. आता त्याला कुटुंबियांकडे सोपवण्यात आलं आहे. या मुलाने PUBG/BGMI चा गेमिंग आयडी, गेमर टॅग खरेदी करण्यासाठी आई-वडिलांच्या अकाउंटमधून 10 लाख रुपये ट्रान्सफर केले. या पैशांचा उपयोग PUBG Mobileच्या इन-गेम करन्सी म्हणजेच UC खरेदीसाठी केला गेला.

मुलाच्या आई-वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातून पळून जाण्याआधी त्याने घरात एक चिठ्ठी लिहिली होती. त्या चिठ्ठीमध्ये त्याने घर सोडण्याबाबत आणि परत कधीही न येण्याबाबत लिहिलं होतं. मुलाचे आई-वडील गेमच्या नादात अकाउंटमधून पैसे ट्रान्सफर केल्यामुळे बुधवारी 25 ऑगस्ट रोजी त्याला ओरडले होते. आई-वडिलांच्या ओरडण्यामुळे त्याने घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. क्राईम ब्रांचने सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्याला ट्रेस केलं आणि शोधून काढलं.