महिलेने कामावर असताना केलं हस्तमैथुन; मग हॉटेलने सर्व केळीचे केलं असं काही…
बातमी विदेश

महिलेने कामावर असताना केलं हस्तमैथुन; मग हॉटेलने सर्व केळीचे केलं असं काही…

मुंबई : एका हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत असलेल्या महिलेनं केळ्याचा वापर करून हस्तमैथुन करतानाचा आपला व्हिडिओ तयार केला. या हॉटेलमध्ये केळी आणि दालचिनीचा वापर करून बनवण्यात येणारे डेझर्ट अतिशय लोकप्रिय होते. मात्र या व्हिडिओमुळे या रेस्टॉरंटची प्रतिमा मलीन झाली आहे. अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामधील रॉकी माउंट शहरात असलेल्या एका जपानी रेस्टॉरंटमध्ये ही घटना घडल्याचे वृत्त आयबीटाईम्सनं दिलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

क्रिस्टीन कोलबर्ट असं या महिलेचं नाव असून, गेली पंधरा वर्षे ती इचिबान जपानी स्टीकहाउस आणि सुशी बार नावाच्या स्थानिक जपानी रेस्टॉरंटमध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. तिनं ओन्ली फॅन्स या लैंगिक व्हिडिओसाठीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर, आपला हस्तमैथुन करतानाचा सेक्श्युअल व्हिडिओ शेअर केला होता. प्राथमिक स्तरावर हॉटेलकडून सगळी केळी फेकून दिली असून, या महिलेला सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे.

ओन्ली फॅन्स हा सबस्क्रीप्शन धर्तीवर चालणारा सेक्श्युअल व्हिडिओसाठीचा ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. त्यावर क्रिस्टीन कोलबर्ट हिचं अँबरली त्रिशेले या नावानं अकाउंट आहे. त्यावर ती आपले सेक्सी व्हिडिओ, फोटो शेअर करते. ते बघण्याकरता युझर्सना मासिक 10 डॉलर्स फी द्यावी लागते. नुकताच क्रिस्टीन कोलबर्ट उर्फ अँबरली त्रिशेले हिनं इथं आपला केळ्याच्या सहायानं हस्तमैथुन करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ तिनं रेस्टॉरंटमध्येच शूट केला होता. ही बाब तिच्या दर्शकांपैकी एकानं ओळखली. त्याबाबतीत त्यानं डब्ल्यूआरएएल न्यूजला माहिती दिल्यानं ही बाब सगळीकडे पसरली.