साईबाबांच्या दर्शनावरून शिर्डीत ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थानचा वाद चव्हाट्यावर
बातमी महाराष्ट्र

साईबाबांच्या दर्शनावरून शिर्डीत ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थानचा वाद चव्हाट्यावर

शिर्डी : ”येणारे वर्ष सुख आणि समृद्धीचं जाव म्हणून ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री अनेक शिर्डीकर साईबाबांच्या मंदिरात जावून बाबांचे आशीर्वाद घेतात. नविन वर्षात नव चैतन्य मिळो म्हणून साईंच्या मंदिरात हजेरी लावतात. ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. मात्र शिर्डीत ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नवीन वर्षाच्या प्रारंभी वाद झाल्याने नगराध्यक्षांसह अनेक गावकऱ्यांना दर्शनासाठी मंदिरात न जाता कळसाचे दर्शन घेणे पसंत केले. शिर्डीचे नवविर्वाचित नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, माजी विश्वस्त तथा शिवसेनेच्या नगरसेविका अनिता जगताप, माजी विश्वस्त सचिन तांबे, नगरसेवक सुजीत गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप यांच्यासह अनेक शिर्डीकरांना मुख्यकार्यकारी आधिकारी कान्हूराज बगाटे यांनी साईमंदिरात जाताना रोखले.

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबरच्या रात्री काही ग्रामस्थ, मानकरी आणि पदाधिकारी शनिगेट जवळील प्रशासकिय व्दाराजवळ जाऊन थांबले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी धावत येवून तुम्ही येथे कसे आलात. चला मागे चला अस म्हणत काही पदाधिकाऱ्यांना खेचण्यास सुरुवात केली. यावेळी शिर्डी ग्रामस्थ आणि मुख्य कार्यकारी बगाटे यांच्यात बराच वेळ वादही झाला. बराच वेळ गोंधळ झाल्यानंतर ग्रामस्थांचा रोष पाहता मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलगीरी व्यक्त केली.

मात्र, ग्रामस्थांना अपमानास्पद वागणूक मिळाल्याने अनेक ग्रामस्थांनी मंदिरात न जाता बाहेरूनच साईंच दर्शन घेत मुख्य अधिकारी बगाटे यांच्या वागणुकीचा निषेध केला आहे. तर नविन वर्षा निमित्तानं आपण साईबाबांच दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. फक्त दर्शन घेवू द्या एवढीच प्रांजळ मागणी आम्ही करत होतो. मात्र, तरीही शिर्डीकरांना आत सोडले नाही. मात्र, त्यांच्या सोबतच्या व्हिआयपींना त्यांनी सोडले, असा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका अनिता जगताप यांनी केला आहे.