हे आहे जगातील सर्वांचे लसीकरण करणारे पहिले शहर
बातमी विदेश

हे आहे जगातील सर्वांचे लसीकरण करणारे पहिले शहर

ब्राझीलिया : संपूर्ण देशभरात करोनाचे थैमान सुरू असताना एका शहराने मात्र, सर्वांचेच लसीकरण करून कोरोनाच्या संसर्गाला थोपवून धरण्याचा प्रयत्न केला आहे. ब्राझीलमधील सेरेना शहराने ही किमया साधली आहे. या शहरातील सर्व प्रौढ व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले आहे. सगळ्या जगात फैलावलेला कोरोना विषाणूचा ब्राझील वेरिएंट या शहरात फैलावला नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

साउ पाउलोमधील सेरेना शहराची लोकसंख्या ४५ हजारांच्या आसपास आहे. यामध्ये जवळपास ३० हजार नागरिक प्रौढ आहेत. एका प्रकल्पातंर्गत या शहराला लसीकरणासाठी निवडण्यात आले होते. प्रकल्पाच्या दृष्टीने या शहराची लोकसंख्या योग्य होती.

या प्रकल्पाचे समन्वयक आणि सेरेना राज्य रुग्णालयाचे संचालक मार्कोस बोर्जेस यांनी सांगितले की, एका संशोधनानुसार, जुलै २०२० मध्ये सेरेनामध्ये पाच टक्के लोकांना करोनाची बाधा झाली होती. चीनने विकसित केलेली सिनोवॅक लशीच्या एका प्रकल्पातंर्गत हे लसीकरण करण्यात आले. ११ एप्रिल पर्यंत २७ हजार ७२२ जणांना करोना लशीचा पहिला डोस देण्यात आला. त्याशिवाय या महिन्याच्या अखेरीस २७ हजार १६० वयस्करांना लशीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. त्यामुळे या सेरेना शहरातील ९५.७ टक्के प्रौढ नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.