धक्कादायक! ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याच्या रागातून गावकऱ्यांचा कुटुंबावर बहिष्कार
देश बातमी

धक्कादायक! ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याच्या रागातून गावकऱ्यांचा कुटुंबावर बहिष्कार

उत्तरप्रदेश : ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याच्या रागातून गावकऱ्यांनी बिजनौरमधील नहतौर भागात राहणाऱ्या एका व्यक्तीवर बहिष्कार टाकल्याची माहिती समोर आहे. परमसिंह सैनी असे या व्यक्तीचे नाव आहे. ”गावात अलीकडेच एक बैठक घेण्यात आली. ज्यात धार्मिक साहित्य आणि काही अन्नधान्याचं वाटप करण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांचा केला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एका व्यक्तीने त्याच्यावर बहिष्कार टाकला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत, परंतु पीडित व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारे तक्रार नोंद करण्यात आली नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ख्रिश्चन धर्माचे काही लोक परमसिंह सैनी नावाच्या व्यक्तीच्या घरी येतात, दर रविवारी त्यांच्याकडे धार्मिक विधी करतात. जेव्हा गावकऱ्यांनी याचा निषेध केला तेव्हा सैनीने स्वतःला ख्रिश्चन असल्याचं सांगितले, आणि त्याचसोबत माझ्या कुटुंबाने ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याची माहितीही त्यांनी दिली.

जेव्हा परमसिंह सैनी यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, तेव्हा धर्म बदलणे ही चांगली गोष्ट नाही, हे आम्ही त्याला पटवून दिले. मात्र त्यानंतर ग्रामस्थांनी बैठक घेतली आणि एकत्रितपणे सैनीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. तसेच यापुढे गावातील कोणीही सैनीच्या कुटुबाशी बोलणार नसल्याचे या बैठकीत ठरवण्यात आले.

तर बिजनौर एसपी धरमवीर सिंह म्हणाले की, ”सैनी यांची भेट घेतली असता त्यांनी धर्मांतर केले नसल्याचे सांगितले. तो काही आजाराने ग्रस्त होता. त्यानंतर तो देहरादूनमध्ये काही लोकांशी भेटला ज्यांनी त्याच्यावर उपचार केले. आता तो आजारातून मुक्त झाला आहे असं सैनी यांनी सांगितले. तसेच मी त्यांच्याकडून दीक्षा घेतली आहे पण धर्म बदलला नाही असं सैनी यांचे म्हणणं आहे, मात्र सैनी यांनी गावकऱ्यांच्याविरोधात तक्रारदेखील दाखल केली नाही.

दुसरीकडे परमसिंह सैनी म्हणाले, आता मी ख्रिस्ती धर्माचा अनुयायी आहे. पूर्वी मी आजारी असायचो. जेव्हा मी ख्रिस्ती धर्म स्वीकारला तेव्हा गॉडने माझ्यावर दया दाखवली, आता मी आता स्वस्थ आहे. भारतीय घटनेने मला कोणत्याही धर्माचे अनुसरण करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. काही गावक्यांनी माझ्यावर बहिष्कार टाकला आहे, ही त्यांची इच्छा आहे, परंतु माझ्या घरी येणाऱ्या प्रत्येकाचे मी स्वागत करीन असं सैनी म्हणाले आहेत.