मोठी बातमी : राज्यात 3 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचे उद्दीष्ट
बातमी महाराष्ट्र

मोठी बातमी : राज्यात 3 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचे उद्दीष्ट

मुंबई : राज्यात 3 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले असून महाराष्ट्र मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहन मंजूर करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यासंदर्भात राज्याच्या उद्योग विभागाचे सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी कॅबिनेटसमोर प्रस्ताव सादर केला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सद्यस्थितीत महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश कोरोना-19 महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करीत आहे. वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे राज्यात मोठया प्रमाणात प्राणवायूचा (Liquid Medical Oxygen) तुटवडा निर्माण झाला आहे. राज्याची प्राणवायू निर्मितीची क्षमता सद्य:स्थितीत 1300 मे. टन/प्रतिदिन असताना 1800 मे. टन एवढ्या प्राणवायूची मागणी आहे. तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे सदर मागणी 2300 मे. टन इतकी वाढण्याची शक्यता आहे.

राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या अनुषंगाने तातडीने ऑक्सिजन निर्मिती व साठा वाढविणे, क्रिटीकल गॅप शोधून कार्यवाही करणे, लॉजिस्टीक ट्रान्सपोर्ट, इत्यादी उपाययोजना करुन राज्य ऑक्सिजन निर्मिती क्षेत्रात स्वावलंबी होण्यासाठी व आवश्यक ऑक्सीजन निर्मितीचे उदिष्ट साध्य करण्याकरीता, राज्यामध्ये मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहने मंजुर करण्याचा व याअनुषंगाने इतर उपाययोजना राज्यामध्ये निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्योगमंत्री सुभाष देसाई ह्यांनी हा खूप महत्वाचा आणि लोकांच्या अतिशय फायद्याचा निर्णय असल्याचे विशद केले.