तेलंगणा सरकारचा मोठा निर्णय; उठवले राज्यातील सर्व निर्बंध
देश बातमी

तेलंगणा सरकारचा मोठा निर्णय; उठवले राज्यातील सर्व निर्बंध

हैद्राबाद : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत असताना अनेक राज्ये निर्बंध शिथिल करत आहेत. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता अजूनही काही भागात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. तेलंगणा सरकारने मात्र राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने लॉकडाउन पूर्णपणे शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तेलंगणा सरकारने आपल्या आदेशात आता राज्यात कोणतेच निर्बंध नसतील, असं जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने ही बाब स्पष्ट केली आहे. तेलंगणा सरकारच्या मंत्रिमंडळात हा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानंतर लॉकडाउन हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्या घट होत आहे. त्याचबरोबर करोना नियंत्रणात आहे, असं सरकारने सांगितलं आहे.

तेलंगणात शुक्रवारी १ हजार ४१७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या ६ लाख १० हजार ८३४ वर पोहोचली आहे. तर एका दिवसात १२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृतांचा आकडा एकूण ३ हजार ५४६ वर पोहोचला आहे.