पुण्यात पहिली लस 74 वर्षीय डॉ. विनोद शहा यांना; लसीकरणानंतर शहा म्हणाले…
पुणे बातमी

पुण्यात पहिली लस 74 वर्षीय डॉ. विनोद शहा यांना; लसीकरणानंतर शहा म्हणाले…

पुणे : “माझ्यासह अनेक जण लसीच्या प्रतिक्षेत होतो. आज अखेर ती प्रतीक्षा संपली असून आज मी लस घेतल्याने मला प्रचंड आनंद झाला आहे.” अशा शब्दात पुण्यातील 74 वर्षीय डॉ विनोद शहा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आजपासून देशभरात कोरोना लसीकरण मोर्हिमेला सुरवात झाली. राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तर तर मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या पार्श्‍वभूमीवर आज पुणे शहरातील पहिली लस कमला नेहरू रुग्णालयात 74 वर्षीय डॉ विनोद शहा यांना देण्यात आली. त्यानंतर शहा यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ही लस प्रत्येकाने घेण्याचे आवाहन त्यांनी केले. पुणे शहरातील महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात आज सकाळी अकरा वाजता डॉ. विनोद शहा लाभार्थी ठरले असून त्यांच्यासह एकाच वेळी तिघांना देण्यात आली आहे. तर पहिल्या तासाभरात दहा जणांना लस देण्यात आली आहे.

यावेळी बोलताना डॉ. विनोद शहा यांच्याशी प्रसारमाध्यमांनी संवाद साधला असता ते म्हणाले की, “ज्या वेळी करोना विषाणूंचे रुग्ण आढळत होते. तेव्हा कोणत्या व्यक्तीना आजार होऊ शकतो. याबाबत माहिती मिळाल्यानंतर माझ वय तर 74 असल्याने मला आधिक धोका असल्याचे वाटले. त्यावर मी कुटुंबीय सह सुरुवातीचे दोन महिने बाहेर गावी गेलो. तरी देखील मी माझ्या रुग्णाच्या सेवेत ऑनलाईनच्या माध्यमातून होतो. थोडसा कालावधी झाल्यावर पुन्हा रूग्णालयात जाऊन सेवा देण्यास सुरवात केली. पण आपल एवढ वय लक्षात घेता आणि इतर आजार असल्याने मला हा आजार होऊ शकतो. अशी भीती होती. मात्र प्रत्येक नियमांचे पालन करून आजारापासून दूर राहण्यात यशस्वी ठरलो आहे. पण त्याच दरम्यान लस लवकरच येणार अशी चर्चा सूर झाली आणि त्याचे काही परिणाम होतील असे बोलले गेले. पण मी ताप येणार याच्यासह काही त्रास जाणवेल. मात्र ही लस घेण्यासाठी कोणी ही घाबरू नका.” सर्वांना लस घेण्याचे त्यांनी आवाहन केले.

दरम्यान, आज पहिल्या दिवशी पुणे शहरातील 8 ठिकाणी लसीकरण करण्यात आले. यात कमला नेहरू रुग्णालयात पहिल्या तासात 10 जणांना दिली लस देण्यात आली. तर राजीव गांधी रुग्णालय, येरवडा, कमला नेहरू रुग्णालय, मंगळवार पेठ, ससून रुग्णालय, पुणे स्टेशन, सुतार दवाखाना, कोथरूड, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, एरंडवणा, रूबी हॉल क्लीनिक, ताडीवाला रस्ता, नोबल हॉस्पिटल, हडपसर, भारती हॉस्पिटल धनकवडी या रुग्णालयांमध्येही लसीकरण करण्यात आले.

तर महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले की, ”गेल्या अनेक महिन्यांपासून संपूर्ण देश कोरोना लसीच्या प्रतिक्षेत होता. मात्र आज लस प्रत्यक्ष देण्यास सुरुवात झाली आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशानुसार प्रत्येकाला लस दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आजवर ज्या प्रकारे काळजी घेतली आणि प्रत्येक नियमांचे पालन केले. त्यानुसार या पुढील काळात देखील काळजी घेण्याचे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले. त्याचबरोबर आजचा दिवस माझ्या दृष्टीने आनंदाचा असल्याचे त्यांनी सांगितले.