धक्कादायक! मुंबईतील रेल्वेरुळावर सापडले आईसह तिघांचे मृतदेह
बातमी मुंबई

धक्कादायक! मुंबईतील रेल्वेरुळावर सापडले आईसह तिघांचे मृतदेह

मुंबई : मुंबईतील नालासोपारा भागात एक धक्कादायक घटना समोर आली असून आईसह दोन मुलांचे मृतदेह रेल्वेरूळावर आढळून आले आहेत. नालासोपारा ते वसई रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचं दिसत असले तरी आत्महत्या केल्याचा संशयही पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नालासोपारा-वसई रेल्वेस्थानकादरम्यान रेल्वे रुळावर एका महिलेसह दहा वर्षीय मुलगा आणि एका मुलीचा मृतदेह आढळून आला. तर एक जण जखमी अवस्थेत आढळून आला. नालासोपारा स्थानकाजवळ ही घटना घडली.

घटनेत आईसह मुलगा जागीच मरण पावले. तर मुलगी गंभीर जखमी झाली होती. रेल्वेखाली चिरडला गेल्यानं आई व मुलाचा मृतदेह छिन्नविछिन्न झाला होता. रेल्वे पोलिसांनी तिन्ही मृतदेह आणि जखमीला रुग्णालयात हलवले.