उत्तर प्रदेशात हजारो मुलं-महिलांचं धर्मांतर! एटीएसकडून पर्दाफाश
देश बातमी

उत्तर प्रदेशात हजारो मुलं-महिलांचं धर्मांतर! एटीएसकडून पर्दाफाश

लखनौ : उत्तर प्रदेशात हजारो मुलं-महिलांचं धर्मांतर झाल्याचे उघड झाले असून याचा एटीएसकडून पर्दाफाश करण्यात आला आहे. एटीएसने आज (ता. २१) सोमवारी मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम या दोघांना अटक केली. उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली असून राष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या धर्मांतर रॅकेटचा ते भाग असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम हे दोघे दक्षिण दिल्लीतील जामिया नगर भागात राहतात. धर्मांतर रॅकेटमध्ये त्यांचा सहभाग असून, मूकबधिर मुलं आणि महिलांचं धर्मांतर केल्यांच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग असून १ हजारांपेक्षा जास्त लोकांचं त्यांनी धर्मांतर केलं असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. नोएडातील मूकबधिर शाळेतील मुलांचंही धर्मांतर त्यांनी केलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी गोमतीनगर पोलीस ठाण्यात राज्यात लागू करण्यात आलेल्या धर्मांतर विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इस्लामिक दवाह केंद्राचे अध्यक्षांचाही दाखल फिर्यादीमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांनी वर्षभरात २५० ते ३०० मुलांचं धर्मांतर केलं असल्याची माहिती दिली आहे. लोकांना पैसे आणि नोकरीचं आमिष देऊन हे धर्मांतर करत होते. कल्याणपूर आणि कानपूर येथील दाम्पत्यांच्या मूकबधिर मुलाचं धर्मांतर करण्यात आलं. त्यानंतर त्याला दक्षिण भारतात पाठण्यात आलं. अशी हजारो प्रकरण समोर आली आहेत, असे पोलिस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.